शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन

By admin | Updated: July 26, 2016 00:49 IST

रिसोड तालुक्यातील प्रकार; रासायनिक औषध फवारणीमुळे जळाली झेंडूची रोपे.

मालेगाव (जि.वाशिम): रासायनिक औषधाची फवारणी केल्यानंतर तब्बल ३0 एकरात लागवड केलेल्या झेंडूची रोपे अक्षरश: जळून खाक झाली. तथापि, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळण्यासाठी शेलगांव राजगुरे (ता. रिसोड) येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मालेगांव येथील प्रशासकीय कार्यालयांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवार, २५ जुलै रोजी भीखमांगो आंदोलन केले.शेलगाव राजगुरे येथील सहा युवा शेतकर्‍यांनी ३0 एकर क्षेत्रात झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. यादरम्यान, रिसोड येथील एका कृषी सेवा केंद्रातून खासगी कंपनीचे आंतरप्रवाही फॉलीकेअर या रासायनिक औषधाची फवारणी केल्यास झेंडूचे पीक बहरते, अशी माहिती मिळाल्याने संबंधित शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये या रासायनिक औषधीची फवारणी केली. मात्र, फायदा होण्याऐवजी झेंडूची सर्व रोपे जळून खाक झाली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी हा प्रकार रिसोड पंचायत समितीकडे कथन केला. मात्र, न्याय मिळवून देण्याऐवजी संबंधित शेतकर्‍यांना प्रशासनाने न्यायालयीन लढाई लढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात चक्क भीखमांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.