कर्वेनगर : डुक्कर खिंडीत डोंगर फोडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी धडकी भरावी, अशा घटना घडत आहेत. छोटेखानी टेकडीवरून दरडी कोसळण्याचे प्रकार होत आहेत. या ठिकाणी पत्रे लावले आहेत. मात्र, पत्र्याला धडकून या दरडी रस्त्यावर येत आहेत. मोठी दरड कोसळल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. येथील संदीप खर्डेकर या भागातून जात असताना त्यांना दरड काढताना कामगार दगड सरळ सोडून देताना दिसत होते. फक्त एक पत्रा सुरक्षितेसाठी लावण्यात आला होता. तेथे काम सुरू होते व तेथील कामगारही भेदरलेले व कोणतेही उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हते.मुळात हे काम दीर्घ काळ रखडले असून, आता तर कोसळणाऱ्या पावसात हा भाग धोकादायक झाला आहे. हे काम करणारी कंपनी व आपण एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहोत काय, असा सवाल संदीप खर्डेकर यांनी केला आहे. त्यामुळे येथे त्वरित सुरक्षेची उपाययोजना करावी. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.(वार्ताहर)
धोकादायक दरडी हटविण्याची मागणी
By admin | Updated: July 4, 2016 01:22 IST