शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: June 9, 2016 01:49 IST

पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

चासकमान : महिला बालकल्याण, समाजकल्याण व कृषी विभागामार्फत १० व २० टक्के निधीमधून वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील पंचायत समिती सदस्यांची शिफारस रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून पीठ गिरणी, पिको-फॉल मशिन, सौरकंदील, मसाला कांडप, केशकर्तनालय खुर्ची, कडबाकुट्टी, कृषिपंप व शेतीसाठी अवजारे देण्यात येत आहेत. अर्जावरील शिफारस प्रमाणपत्राद्वारे पंचायत सदस्यांकडून मजीर्तील लाभार्थींना लाभ दिला जात आहे. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत, तसेच पंचायत समिती सदस्यांची शिफारसपत्र घेण्याचा कोणताही शासन निर्णय नसताना त्यांनी शिफारसपत्र देऊन पदाचा गैरवापर केला आहे. गोरगरीब खरे लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून या लाभाच्या योजनेमधून पंचायत समिती सदस्यांची शिफारस तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पवळे यांनी केली आहे.जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षात असताना या शिफारशींना तीव्र आक्षेप घेतला होता. ही शिफारस रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर ही शिफारस रद्द करण्याचा आदेश तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी दिला होता. त्यानुसार मध्यंतरी काही काळ ही शिफारस रद्द करण्यात आली होती.