अतिशय बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्था हाती असताना शेतकरी, ग्रामीण जनता, महिला यांच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष देणारा हा अथर्संकल्प असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेषत: ग्रामीण रस्त्यांसाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागील सात वर्षांच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च १८ हजार कोेटी रुपयांपासून २२ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला. हा अथर्संकल्प थेट २८ कोटी रुपयांत गेला आहे. हा खर्च ४० हजार कोटी रुपयांपर्यंंत जाण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यावेळी राज्यात खूप मोठया पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होईल. कृषी, पायाभूत सुविधांसह विशेष कौशल्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामाध्यमातून बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.
दिलासादायक अर्थसंकल्प
By admin | Updated: March 19, 2015 00:54 IST