शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीने दिला युतीचा कौल?

By admin | Updated: March 1, 2017 06:42 IST

भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले.

नवी दिल्ली /मुंबई : महाराष्ट्रातील १0 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले. तब्बल दीड तास झालेल्या चर्चेमध्ये आता निवडणुका संपल्यामुळे शिवसेनेशी पुन्हा संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते.गेली २५ वर्षे आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांची मदत घेतल्यास आपली कायमस्वरूपी अडचण होईल आणि ती होणे योग्य नाही, अशी दिल्लीतील भाजपा नेत्यांची भूमिका आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हेही दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र यायला हवे, या मताचे आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपा यांच्यातील संबंध सुधारण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू होण्याची चर्चा आहे. पुन्हा एकत्र येताना मुंबई महापालिकेत भाजपाला अगदीच दुय्यम भूमिका मिळता कामा नये आणि काही महत्त्वाच्या समित्यांची अध्यक्षपदे तसेच अडीच वर्षे महापौरपद आपल्याला मिळावे, अशी भाजपामधील अनेकांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या चर्चेत राज्यात भाजपची सुधारलेली कामगिरी आणि मुंबईचे महापौरपद हे प्रमुख मुद्दे होते. मात्र शिवसेनेच्या धमक्या आणि त्यातून आलेली कटुता यांवर अधिक विचारविनिमय झाल्याचे समजते. याच वर्षी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका यांमुळे आपण या घडीला कोणत्याही मित्रपक्षाशी संबंध तोडू नयेत, किंबहुना असलेली कटुता दूर करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येते.शिवसेनेची आक्रस्ताळी भाषा, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे इशारे आणि राज्यातील सेनेच्या काही मंत्र्यांचा मनमानीपणा याची माहिती फडणवीस यांनी बैठकीत मोदी यांना दिल्याचे बोलले जाते. मात्र हे खरे असले तरी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणि महाराष्ट्रात युतीमध्ये असलेल्या भाजपशी संबंध बिघडवण्याची ही वेळ नाही, असे मोदी म्हणाले, असे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौननिवडणुकांच्या आधी आणि त्या काळात शिवसेना व भाजपा यांच्यात निर्माण झालेली कटुता संपवून, पुन्हा संबंध सुधारणे गरजेचे आहे. मात्र तसे करताना आपण झुकता कामा नये, असे मोदी यांनी फडणवीस यांना सुचवल्याचे कळते. या बैठकीबाबत फडणवीस यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यांची पंतप्रधानांशी झालेली चर्चा प्रामुख्याने शिवसेनेशी यापुढे कसे संबंध असावेत, यावर झाल्याचे कळते. >दोघे घेणार पुढाकार? : भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यासाठी पुढाकार घेतील, असा अंदाज आहे. या दोघांनी याआधीही अनेकदा दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका जाहीरपणे घेतली आहे. मात्र शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे गरजेचे आहे.