शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेट्टींना न घेताच विमान दिल्लीला

By admin | Updated: June 15, 2017 01:42 IST

विमान कंपन्या, विमानातील कर्मचारी आणि खासदार यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. जेट एअरवेजच्या हलगर्जीपणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमान कंपन्या, विमानातील कर्मचारी आणि खासदार यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. जेट एअरवेजच्या हलगर्जीपणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांना बुधवारी मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीला निघालेल्या शेट्टी यांनी मुंबई विमानतळावर वेळेत पोहोचून रीतसर बोर्डिंग पास घेतला असतानाही त्यांना न घेताच विमानाने उड्डाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यातील वाद गाजला होता. दिल्लीला जाण्यासाठी खासदार शेट्टी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. ६ वाजता त्यांनी बिझनेस क्लासचे तिकीटही घेतले. तासभर आधीच विमानतळावर दाखल झालेल्या शेट्टी यांनी बोर्डिंग पास घेतला. विमानाच्या उड्डाणाला वेळ असल्याने ते काही वेळ लॉजमध्ये बसले होते. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी आले असता बोर्डिंग बंद झाल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. ‘बोर्डिंग पास घेतलेला असताना आणि रजिस्टरमध्ये नोंद केलेली असताना, मला न घेता विमानाने उड्डाण भरलेच कसे, असा सवाल शेट्टी यांनी केला. याबाबत जेट एअरवेजकडे विचारणा केली असता कंपनीनेही हात वर केले. शेट्टी यांनी आपल्याला आवश्यक मिटिंगसाठी दिल्लीला जाणे गरजेचे असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्या वेळी जेट एअरवेज प्रशासनाने त्यांना ७च्या विमानाचे बदली तिकीट दिले. पण त्यासाठी दोन हजार रुपये वसूल केले. शेट्टी यांनी चूक नसल्याने पैसे भरण्यास नकार दिला. मात्र जेट एअरवेज ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी शेट्टी यांनी कार्डद्वारे दोन हजारांचे पेमेंट केले. मात्र त्याची पावती देण्यास नकार दिला. जेट एअरवेजमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल विमानतळ प्राधिकरणाकडे शेट्टी तक्रार करणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.पैसे परत करण्याचे आश्वासनजेट एअरवेजने झाल्या प्रकाराबद्दल शेट्टी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून, पर्यायी व्यवस्थेसाठी वसूल केलेले दोन हजार रुपये परत करण्याचे आश्वासन दिले आहे. टी-२ टर्मिनस शांतता क्षेत्र असल्याने अनाऊंसमेंट करण्यात आली नाही, असे सांगताना शेट्टी बोर्डिंगसाठी वेळेवर आले नसल्याचा दावाही जेटने केला. मात्र, नियमानुसार लोकप्रतिनिधींना मदतनीस पुरविणे आवश्यक असताना त्याबाबत जेटने मौन बाळगले आहे.