शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 20, 2016 02:15 IST

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘लॉटरी सिस्टम’मुळे ही समस्या निर्माण झाली असून, यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.नागरिकांच्या घरी जात कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे हे दत्तक वस्ती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. १९९७ साली हे काम बोरीवलीमधील काजुपाडा परिसरात असलेल्या ‘आदर्श नागरीक सेवा संस्थे’ मार्फत सुरु झाले. ज्या संस्थेला १९९७ मध्ये ‘बेस्ट वर्कर अ‍ॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले होते. या अंतर्गत स्थानिकांना माफक किंमत आकारून कचरा गोळा करण्याचे काम केले जात होते. या कामातून गोळा झालेल्या रक्कमेतुन कचरावेचकांना विम्याची सुविधा दिली जात होती, असे संस्थेचे प्रमुख अभय चौबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याच कामाकडे पाहून महापालिकेने दत्तक वस्ती योजना सुरु केली, असा दावाही चौबे यांनी केला. मात्र यात कामगारांना काहीच सुविधा देण्यात आली नाही. शिवाय कमी मोबदल्यात चौपट काम करून घेण्याकडे कल वाढला. परिणामी कामाचा दर्जा घसरला, असेही त्यांनी सांगितले. >तीन वेळा निघाल्या जाहिरातीपहिली जाहिरात : दत्तक वस्ती योजनेत संस्थेची निवड करण्यासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असणे बंधनकारक होते.दुसरी जाहिरात : दुसऱ्या वेळच्या जाहिरातीत बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले. आणि यावेळी सुरुवातीच्या अटी तशाच ठेवत संस्थेच्या नोंदणीकृतसंबंधीची अटल शिथिल करण्यात आली.तिसरी जाहिरात : तिसऱ्यांदा पालिकेने ‘लॉटरी’ पद्धत सुरु केली. यात नोंदणी असलेल्या नसलेल्या, तसेच मनुष्यबळ किंवा आर्थिकदृष्टया सक्षम आणि अक्षम असलेल्या सर्वच संस्थांना अर्ज करण्याची परवानगी होती. त्यामुळे लॉटरीमध्ये ज्या संस्थेचे नाव येईल; त्या संस्थेला कंत्राट मिळू लागले. मात्र या पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरला. कारण लॉटरीमुळे पुरेसे मनुष्यबळ व आर्थिकदृष्ट सक्षम नसलेल्या मात्र तरीही कंत्राट मिळालेल्या संस्थाचा समावेश अधिक होत होता. शिवाय अनुभवी आणि सक्षम संस्था यातुन बाहेर पडल्या होत्या.>सहाऐवजी तीन महिनेच कामदत्तक वस्ती योजनेमध्ये दर सहा महिन्यांनी लॉटरी काढण्यात येत असल्याने अप्रशिक्षित लोकांना काम समजून घेण्यात आणि विभागाची माहिती मिळविण्यात तीन ते चार महिने जातात. मात्र काम समजल्यानंतरही लॉटरी पद्धतीत पुढे आपल्याला काम मिळेल की नाही? याची शाशवती नसल्याने या संस्थेचे कंत्राटदार दोन ते तीन महिने आधीच काम बंद करतात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.>उपाययोजनामुंबई २२७ वॉर्ड असुन प्रत्येक वॉर्डमध्ये कमीतकमी चार ते पाच दत्तक वस्ती संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रशिक्षित आणि अनुभवी संस्थाना लॉटरीमध्ये न टाकता त्यांना कामाची मोकळीक देणे. नवीन संस्थांची लॉटरीमार्फत निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे.लॉटरीची मुदत वाढविणे जेणेकरून नवीन संस्थाना काम करण्यास वेळ मिळेल.उत्तम काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे.