शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटविणे हाच एक पर्याय नाही

By admin | Updated: June 6, 2016 03:14 IST

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात यावे, ही देशातील अनेक संघटना व संस्थांची अपेक्षा आहे. परंतु केवळ कलम ३७० हटविणे हा एकच पर्याय नाही.

योगेश पांडे ,  नागपूरजम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात यावे, ही देशातील अनेक संघटना व संस्थांची अपेक्षा आहे. परंतु केवळ कलम ३७० हटविणे हा एकच पर्याय नाही. संविधानात सुधारणा घडवून कलमातील अटी शिथीलदेखील करता येऊ शकतात. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुद्यावर देशपातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पार्टीच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कलम ३७०चा विषय निघताच गोंधळ सुरू होतो. हा केवळ काश्मीरच नव्हे तर देशाशी जुळलेला मुद्दा आहे. तेथे व्यापार करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांशीदेखील त्याचा संबंध आहे. कलम ३७० हटले तर कुठल्याही राज्यातील व्यापारी तेथे जाऊन व्यापार करूशकेल. यात काश्मिरी जनतेचादेखील फायदाच होणार आहे.कलम ३७० हटविण्याबाबत काश्मिरी जनतेसोबतच संपूर्ण देशाचे मत लक्षात घ्यायला हवे. केंद्र सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कलम ३७० हटेल की नाही याबाबत भाष्य करता येणे शक्यनाही. परंतु यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत, असे चारी यांनी स्पष्ट केले.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या मुद्यावर केंद्र गंभीर असून मंत्रालयीन पातळीवर विविध आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतु त्यांची आताच वाच्यता करणे योग्य होणार नाही, असेदेखील ते म्हणाले.