शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समूह विकासावरील स्थगिती हटवा

By admin | Updated: June 6, 2017 05:53 IST

मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास न करताच राज्यातील मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती. परंतु, नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या अखत्यारित येणाऱ्या विभागाचा अभ्यास करून याठिकाणी समूह विकास केला जाऊ शकतो, असे म्हणत राज्य सरकारने नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर यांसारख्या शहरांमध्ये समूह विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. समूह विकास करणाऱ्या खासगी विकासकाला चार एफएसआय देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला ठाण्याचे रहिवासी दत्तात्रय दौंड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या योजनेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा व या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणाचाही सरकारने अभ्यास केला नाही. त्यामुळे सरकारला आधी अभ्यास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती दौड यांनी याचिकेत केली आहे.याचिकाकर्त्याची विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१४ मध्ये समूह विकासाला स्थगिती दिली. राज्य सरकारला याबाबत अंतिम निर्णय न घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. त्यावर तब्बल दोन वर्षांनी नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, असे सांगत अर्जानुसार, नवी मुंबई व सिडकोने अभ्यास करून नवी मुंबईचा समूह विकास करणे शक्य आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येणार नाही. नवी मुंबई व सिडको याबाबत योग्य व्यवस्थापन करेल. त्यामुळे नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवावी, असे राज्य सरकारने सांगितले. उच्च न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.