शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांना मंत्रिपदावरून हटवा

By admin | Updated: June 3, 2016 03:29 IST

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वारंवार फोनवर संपर्क झाला असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला

कोल्हापूर : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वारंवार फोनवर संपर्क झाला असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाकावे, शिवाय त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हाही नोंदविला गेला पाहिजे, अशीमागणी माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. संभाषणाचे प्रकरण अंगलट आल्यावर दाऊदने खडसे यांना धमकीचे फोन केले होते, असा खुलासा केला जात आहे. जर खरेच धमकीचे फोन असतील, तर मग खडसे यांनी पोलिसांत ‘एफआयआर’ का दाखल केला नाही? ज्या महिन्यात दाऊदचे फोन झाले, त्या महिन्यात फोन बंद होता, असे खडसेम्हणतात. मग त्याच महिन्यातत्यांचे फोनचे बिल १३०० रुपये कसे आले? असे प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)अण्णांची सावध भूमिकापारनेर (जि. अहमदनगर) : मी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. परंतु सबळ पुराव्याशिवाय कधीही बोललो नाही. एकनाथ खडसे यांच्याविषयी माझ्याकडे जोपर्यंत सबळ पुरावे नाहीत तोपर्यंत केवळ हवेत बोलणे योग्य होणार नाही, अशी सावध भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या पथकाने बुधवारी (दि. १) सनातन संस्थेच्या साधकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. जर सनातन संस्थेवर तुमचा संशय होता, तर मग इतके दिवस सीबीआय झोपले होते का? असा सवाल करून सनातन संस्थेला क्लीन चिट देण्याचा हा प्रकार असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला. या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचा आमचा ठाम संशय होता. म्हणूनच आम्ही सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठविला होता, असेही त्यांनी सांगितले.