शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर बांधकाम सहा महिन्यांत हटवा

By admin | Updated: March 3, 2016 04:35 IST

भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम सहा महिन्यांत हटवण्याचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने भाजपाला दिला.

मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम सहा महिन्यांत हटवण्याचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने भाजपाला दिला. भाजपाने सहा महिन्यांत हे बेकायदेशीर बांधकाम हटवून १९८९ मध्ये ज्या स्थितीत कार्यालय होते, त्याच स्थितीत न ठेवल्यास महापालिका कोणतीही नोटीस न देता स्वत:च हटवेल, अशी समजही उच्च न्यायालयाने भाजपाला दिली आहे. नरिमन पॉइंट येथील जवाहरलाल नेहरू गार्डनमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यालय उभे आहे. सरकारने या कार्यालयासाठी १,२०० चौ. फूट जागा दिली होती. मात्र, कालांतराने भाजपने यावर अतिक्रमण करून ४,६२८ चौ. फूट जागा बळकावली, तसेच जनता दल पक्षानेही गार्डनवरील काही भूखंड बेकायदेशीरपणे हडपला आहे. १९९१च्या विकास आराखड्यात नेहरू गार्डन मनोरंजन पार्क असे दाखवूनही या ठिकाणी एमटीडीसी, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज, महिला आर्थिक विकास महामंडळ, झुणका भाकर केंद्र इत्यादींना जागा देण्यात आली आहे. याविरुद्ध ‘नरिमन पॉइंट चर्चगेट सिटिझन वेल्फेअर ट्रस्ट’ने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.मंगळवारी भाजपाने माघार घेत, वाढीव बेकायदेशीर बांधकाम हटवून बांधकाम पूर्ववत करण्याची तयारी दर्शवली. मनोरंजन पार्कवर उभ्या असलेल्या भाजपा कार्यालयासह अन्य संस्थांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारलाही खंडपीठाने चांगलेच फटकारले. ‘मनोरंजन पार्कवरील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यापासून सरकारला कोणी रोखले? मुंबईत मोकळे भूखंड आणि मनोरंजन पार्कची आधीच वानवा आहे. लोकांना प्रदूषणविरहित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारवर गदा येत आहे, सरकारने याबद्दल विचार करावा. राज्य सरकारला मनोरंजन पार्कचे संरक्षण करण्यापासून कोण रोखत आहे?’ असा प्रश्न खंडपीठाने केला. भाजपा व जनता दलाचे कार्यालय भाडेतत्त्वावर असल्याने १९९१ नंतर ही मुदत वाढवण्यात आली नसतानाही अद्याप ही कार्यालये या ठिकाणी कशी? असाही प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. (प्रतिनिधी)