शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

मुंबईत २५ टक्के विमानांना विलंब

By admin | Updated: May 11, 2016 03:57 IST

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही.

प्रमोद गवळी, नवी दिल्लीमागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे या विमान कंपनीचा ओटीपी आजदेखील ७९ टक्क्यांच्या वर नाही. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा ओटीपी त्यापेक्षाही कमी म्हणजे ७४.८ टक्के आहे.नागरी उड्डयण राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शर्मा बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘१ एप्रिल २०१५ पासून तर ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या काळात एयर इंडियाच्या नेटवर्कअंतर्गत एकूण १,५१,९९० उड्डाणे करण्यात आली. त्यात ३२,८४३ उड्डाणे अशी आहेत की, ज्यांची १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंबाने उड्डाण केले आहे. याच काळात मुंबईवरून २२,४०१ पैकी ५६०३ उड्डाणांना १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला होता.’विमान उड्डाणांमध्ये होणाऱ्या विलंबामागे ‘रिअ‍ॅक्शनरी’चे सर्वांत मोठे योगदान आहे. याचा अर्थ, आधी येणारे विमान उशिरा पोहोचले की, दुसऱ्या विमानाला विलंब होतो किंवा एखाद्या विमानाने उशिरा उड्डाण केले की, त्यानंतरच्या दुसऱ्या विमानाच्या उड्डाणासही उशीर होतो. धावपट्टी ०९/२७ ची घोषित क्षमता प्रतितास ४५ विमाने आवागमन आणि धावपट्टी १४/३२ ची घोषित क्षमता प्रतितास ३५ विमाने आवागमन एवढी आहे. संचालनासाठी एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर केला जाऊ शकतो,’ असे डॉ. शर्मा यांनी या वेळी सांगितले.>डॉ. शर्मा म्हणाले, ‘सर्व ए ३२० फॅमिली विमाने उड्डाणयोग्य आहेत. कारण अनुमोदित अनुसूची अथवा कार्यक्रमानुसार त्यांची देखभाल केली जाते. त्यामुळे या विमानांबाबत कसलीही समस्या नाही. एअर इंडियात १४ नवीन ‘ए ३२०’ विमाने खरेदी करण्याचा निर्णय एअर इंडिया बोर्डने नुकताच घेतलेला आहे.’