शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड रस्ता चौपदरीकरण रखडले

By admin | Updated: September 20, 2016 02:15 IST

उड्डाणपूल बांधण्याच्या कामास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सोमवारी सकाळपासून येथे बेमुदत धरणे आंदोलन

देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे निगडी ते देहूरोडदरम्यानचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल बांधण्याच्या कामास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सोमवारी सकाळपासून येथे बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले. काम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित रस्त्याचे काम सुरू करण्याची तारीख जाहीर करून तसे पत्र द्यावे व देहूरोड येथील रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविल्याची सर्व कागदपत्रे सादर करण्याची मागणी आंदोलकांनी या वेळी उपस्थित महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याबाबत पूर्तता न झाल्याने धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयादरम्यान उड्डाणपूल बांधण्यास दिरंगाई होत असून, गेल्या काही वर्षांत महामंडळाकडून अनेकदा काम सुरू करण्याबाबत लेखी व तोंडी आश्वासने मिळूनही अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी या अरुंद रस्त्यावर अपघात सत्र सुरू असून, त्यात आजतागायत ३५० हून अधिक बळी गेले असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व शासन यांच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकर मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली मंचाचे सभासद, काही पक्षांचे कार्यकर्ते व विविध संस्था, संघटना यांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी दहापासून महामार्गालगत जुन्या बँक आॅफ इंडिया चौकात धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. सकाळी देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदिनाथ महानवर व पोलीस कर्मचारी योगेश जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दिवसभरात रस्ते विकास महामंडळाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याची माहिती समोर आली आहे. (वार्ताहर)