शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

तुकोबांच्या पालखी सोहळ्यास देहूकरांचा निरोप

By admin | Updated: June 18, 2017 00:23 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वैष्णवांच्या जनसागरासह शनिवारी सकाळी आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

- लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव (पुणे) : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वैष्णवांच्या जनसागरासह शनिवारी सकाळी आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळी ११च्या सुमारास इनामदारवाड्यातून सोहळा बाहेर पडला. साडेअकराच्या सुमारास पालखी महाद्वार प्रवेशद्वार कमानीमध्ये (वेस) आल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाचा गजर आणि पखवाजाचा ठेका धरला.पालखी कापूरओढा येथील अनगडशहावली दर्ग्याजवळ आल्यानंतर पहिली अभंग आरती बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. आरती होताच परिसरातील भाविक पालखीला भक्तिभावाने निरोप देऊन माघारी फिरले. दुपारी २च्या सुमारास पालखी चिंचोली येथील शनि मंदिराजवळ आल्यानंतर पहिल्या विसाव्यासाठी थांबली. येथून विसावा घेतल्यानंतर पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. पोलिसांनी पालखीभोवती दोर लावलेला असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. पालखीचे दर्शन घेता न आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.पालखी मार्गावर विविध संस्थानी भाविकांना अन्नदान, फळांचे व बिस्किटांचे वाटप केले. देहूगाव येथील शिरिषकुमार मंडळ, दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर यांनी अन्नदान केले. माळीनगर येथे सरपंच टिळेकर यांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचला पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले़