शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६० कर्मचाऱ्यांची पदावनती

By admin | Updated: May 5, 2017 04:08 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील तब्बल ६० कर्मचारी/अधिकाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील तब्बल ६० कर्मचारी/अधिकाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे. पदोन्नतीच्या काळात जास्तीच्या दिल्या गेलेल्या २ कोटी २५ लाख रुपयांची वसुली त्यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम हे आघाडी सरकारच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष असताना २०११ ते २०१३ या काळात हा पदोन्नती घोटाळा घडला होता. महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करताना ‘लोकमत’ने या घोटाळ्यावरदेखील प्रकाश टाकला होता. पदोन्नतीच्या निकषात न बसणाऱ्यांना पदोन्नती बहाल करण्यात आली होती. आधी इंगळे आणि नंतर एस. के. बावणे हे त्या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. इंगळे हे रमेश कदमप्रमाणेच आर्थर रोड जेलची हवा खात आहेत. मात्र, बावणे अजूनही फरार आहेत. नियमबाह्य पदोन्नती मिळालेल्या ६० कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१५मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. शिवाय, महामंडळानेही तपासणी केली. ही तपासणी आणि कर्मचाऱ्यांनी नोटिशींना दिलेली उत्तरे यातून नियमबाह्य पदोन्नतीवर शिक्कामोर्तब झाले. नोकरी वाचविण्याच्या धडपडीपोटी या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमबाह्य पदोन्नतीच्या काळात मिळालेल्या जादाच्या वेतनाची रक्कम महामंडळाकडे भरण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम प्रत्येकी तीन लाख ते १० लाख रुपयांच्या घरात आहे. आता या कर्मचारी/अधिकाऱ्यांना पुढील महिन्यापासून त्यांच्या पदोन्नतीच्या आधीच्या पदाचे वेतन पुढील महिन्यापासून दिले जाईल. त्यामुळे महिन्याकाठी महामंडळाचे किमान १५ लाख रुपये वाचणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांना मिळणाऱ्या वाढीव आर्थिक लाभापैकी ५० टक्के रक्कम ही महामंडळातील घोटाळेबाजांना या कर्मचाऱ्यांकडून मिळत होती, असे म्हटले जाते. (विशेष प्रतिनिधी) पदोन्नतीसाठी अनेक प्रकारचा बनाव पदोन्नती नियमात बसविण्यासाठी अनेक प्रकारचा बनाव करण्यात आला. एखाद्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या तारखेच्या दोन-तीन वर्षे आधीचा मानीव दिनांक (नोशनल डेट) दाखविला जायचा. च्जेणेकरून त्याची सेवाज्येष्ठता दिसेल आणि त्याला पदोन्नती दिली जाऊ शकेल. सेवेची तीन वर्षे पूर्ण न केलेल्यांनादेखील पदोन्नतीची खिरापत वाटण्यात आली होती.