शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये घट

By admin | Updated: May 6, 2016 02:13 IST

बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित

मुंबई : बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिली. विदर्भातील सहा, मराठावाड्यातील आठ आणि सोलापूर अशा १६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महसूलमंत्री एकनाथ खडसे हे जळगाव येथून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. जलयुक्त शिवार योजनेची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यानेच आत्महत्या कमी होऊ शकल्या, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ८२ हजार अर्ज आलेले आहेत. या १६ जिल्ह्यांमध्ये त्यातील १३ हजार ६८० शेततळ्यांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी) सुधींद्र कुलकर्र्णींची उपस्थिती!- आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांची आजच्याबैठकीतील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. मराठवाड्यातील दुष्काळाचा अभ्यास करून तयार केलेला अहवाल या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. - ओआरएफ संस्थेच्या अहवालातील प्रमुख शिफारशी अशा - स्वतंत्र दुष्काळ निवारण खाते निर्माण करावे, दुष्काळ जागृती अभ्यासक्रम सुरू करावा, नद्यांच्या प्रवाहांचे मॅपिंग करा, दुष्काळाशी संबंधित पदांना प्रतिष्ठा द्यावी, दुष्काळासंबंधीची माहिती आॅनलाइन करा, आजवरच्या सर्व उपाययोजनांचे आॅडिट करावे, ग्राहक गट आणि शेतकरी गटांची स्थापना करावी आदी.