सद्गुरू पाटील, पणजीसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा साठावा वाढदिवस रविवारी गोव्यात साजरा होत असून, त्याच्या भव्यतेस गोवा काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. अतिवृष्टीचा चेन्नईला फटका बसलेला असताना तेथील लोकांना दिलासा देण्याऐवजी वाढदिवसावर भाजपा कोट्यवधी रुपये खर्च कसे करू शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने हा वाद पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचविल्याने गोव्यातील भाजपा सरकारमध्ये नाराजीचा सूर आहे.पर्रीकरांच्या सत्कारासाठी प्रदेश भाजपाने ५० हजार गोमंतकीयांना निमंत्रित केले आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीचा गोव्यात पहिल्यांदाच असा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी १३५ सदस्यांची समिती नेमून तिच्याकडे सोहळ्याचे काम सोपविले आहे. (खास प्रतिनिधी)सरकार चेन्नईमधील लोकांसाठी मदत निधी उभा करेल; पण पर्रीकर यांचा वाढदिवस गोव्याची जनता साजरा करत आहे. हा सोहळा थांबविला जाणार नाही. त्यावरील खर्च पर्रीकर यांचे हितचिंतक करतील. अनेक कोटींचा खर्च होईल, हा काँग्रेसचा दावा खोटा आहे. पर्रीकर यांचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्याची पोचपावती जनता सत्कारातून देईल.- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री
संरक्षणमंत्र्यांचा वाढदिवस वादात
By admin | Updated: December 12, 2015 02:41 IST