शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

By admin | Updated: February 27, 2017 00:13 IST

निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात किमान २०० याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांतील पराभूत उमेदवार व प्रतिनिधींच्या बैठकीत शनिवारी ठरविण्यात आले. यावेळी मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणीही करण्यात आली.महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने ९८ जागांवर विजय संपादन करीत घवघवीत यश मिळविले आहे. अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, ही मते मतदान यंत्रांतील घोळामुळे मिळाल्याचा आरोप अनेक पराभुत उमेदवारांकडून केला जात आहे. या मुद्यावर शनिवारी विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकत्र आले. यावेळी माजी आमदार बापु पठारे, नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, अ‍ॅड. रुपाली पाटील, सचिन भगत, धनंजय जाधव, विनायक हनमघर यांच्यासह दत्ता गायकवाड, विजय मारटकर, निलेश निकम, राम बोरकर, नारायण चव्हाण, सुधीर काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार तसेच मोठ्या संख्यने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाची पालिकेत एकहाती सत्ता आली आहे. पण त्यासाठी सत्तेचा गैरवापर करून मतदान यंत्रात मोठा घोळ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)