शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात विमा कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक

By admin | Updated: January 11, 2016 02:39 IST

राज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले, तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच ते आढळून आले आहे.

राजेश निस्ताने,  यवतमाळराज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले, तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच ते आढळून आले आहे. थोड्याशा पैशासाठी हे चालक अपघाताचा गुन्हाच स्वत:च्या अंगावर घेतात. या मृत्यूूदाव्यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली जात आहे. अपघात विम्याचा लाभ मिळविण्यासाठी आता हा नवा फंडा जोरात सुरू आहे. अपघात विमा लाटण्याच्या या प्रकारात पोलीस, गाडी मालक, चालक, कायद्याचे अभ्यासक, डॉक्टर, विमा कंपन्यांचे इन्व्हेस्टिगेटर व अधिकारी असे सर्वच घटक सहभागी आहेत. अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना वैैयक्तिक विमा (त्याने काढलेला असेल तर) लाभ मिळू शकतो. मात्र, त्याला अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठी सर्कस केली जाते. विमा असलेल्या जड वाहनाचा चालक अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी तयार केला जातो. त्याला २५ ते ५० हजार रुपये दिले जातात. या गुन्ह्यात सुरुवातीला वाहन अज्ञात असते. नंतर कुणी तरी प्रत्यक्ष साक्षीदार उभा करून आपल्या सोयीच्या वाहनाचा व चालकाचा सहभाग दाखविला जातो. ‘नियोजित’ चालक न्यायालयात गुन्हा कबूल करतो, न्यायालय त्याला केवळ दंड ठोठावते. त्याच्या या कबुलीने अपघात विमा प्राधिकरण मृताच्या वारसांना विमा लाभ मंजूर करते.विशेष असे, अनेक अपघात हे मध्यरात्रीनंतर आणि निर्जन स्थळी झालेले असतात, तरीही कुणीतरी हा अपघात पाहणारा उभा केला जातो. सर्व मिलीभगत असल्याने कुणीच काही खोलात जाण्याची तसदी घेत नाही.