शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात अवतरले दीपिका-रणवीर

By admin | Updated: September 16, 2015 12:19 IST

पुण्याच्या गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भव्य गणरायाच्या प्रतिमेचे कौतुक करण्यासाठी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन अवतरले.

पुणे : कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देत पुण्याच्या गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भव्य गणरायाच्या प्रतिमेचे कौतुक करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन अवतरले. गणेशमय झालेल्या वातावरणात रणवीर सिंहने प्रचंड उत्साहात ढोल वाजवायला सुरुवात केली आणि संपूर्ण शिवछत्रपती क्रीडासंकुल 'लोकमत आपले बाप्पा'च्या जयघोषात निनादून गेले. सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत आणि संजय घोडावत ग्रुप सहप्रायोजक असलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमांतर्गत पुण्यातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी गणेशाचा भव्य कोलाज साकारला. रणवीर आणि दीपिका या उपक्रमात सहभागी होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना लोणावळ्यातूनच हेलिकॉप्टरने परत फिरावे लागले. मात्र, हजारो विद्यार्थी आणि गणेशभक्तांचा उत्साह पाहून 'लोकमत'ने खास विमानाची व्यवस्था केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात रणवीर-दीपिकाचे आगमन होताच एकच उत्साहाचे वातावरण संचारले. 'लोकमत आपले बाप्पा'चा जयघोष होऊ लागला. पिंपरी-चिंचवड ढोलताशा महासंघाचे शेकडो वादक देहभान हरपून ढोलवादन करू लागले. रणवीर सिंहनेही उत्साहात सहभागी होऊन ढोलवादन केले. दीपिकाही त्याला प्रोत्साहन देऊ लागली. गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांनी उत्साह वाढविलेला होता. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी गाण्यांची मुखड्यांनी रंगत आणली. या वेळी सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष राजेश साकला, कॉसमॉस बॅँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा संजय काकडे, न्यू पुना बेकरीचे कुणाल भूषण गिरमकर यांच्यासह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., हॉटेल कोर्टयार्ड मॅरिएट, न्यू पूना बेकरी आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. (प्रतिनिधी)