शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

उंड्रीमध्ये तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 11, 2016 01:00 IST

पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा नावापुरता होत असल्यामुळे उंड्री गावात तीव्र पाणीटंचाई काही महिन्यांपासून निर्माण झाली

उंड्री : पुणे पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा नावापुरता होत असल्यामुळे उंड्री गावात तीव्र पाणीटंचाई काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे. महापालिकेच्या हद्दीस लागून असलेले व अंशत: महापालिकेत समाविष्ट झालेल्या उंड्री ग्रामपंचायतीस महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. परंतु काही महिन्यांपासून होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद झाल्यामुळे ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा करणे प्रचंड अवघड व खर्चिक होत आहे. उंड्रीमधील मोठमोठे गृहप्रकल्प व या भागात असणाऱ्या नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा यामुळे येथील नागरीकरण वेगाने होत आहे. गेल्या काही वर्षात लोकसंख्या दुपटीपेक्षा जास्तीने वाढली आहे. ग्रामपंचायतीने गावात पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वत्र नळजोड दिले आहेत. पालिकेकडून ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा होत असलेल्या पाईपलाईनलाच पालिका हद्दीतच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोड घेतल्यामुळे पाणीपुरवठा अल्पप्रमाणात होतो. या अनधिकृत नळजोडावर कसलीही कारवाई होत नाही.ग्रामपंचायतीने स्वबळावर लाखो रुपये खर्च करून सुरळीत पाणीपुरवठा होईल अशी केलेली व्यवस्था यामुळे निकामी ठरत आहे, असे माजी उपसरपंच सचिन घुले म्हणाले. महानगरपालिकेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपसरपंच वसंत कड, निवृत्ती बांदल, सुरेखा कड, प्रवीण आबनावे, मोहन कामठे यांनी सांगितले.(वार्ताहर)>टँकरने होतोय पाणीपुरवठा४उंड्री गाव व महापालिकेच्या सीमेजवळून महंमदवाडीत पालिकेची पाण्याची लाईन गेलेली आहे. त्यातून किंवा खडी मशीन चौक येथील पाण्याच्या लाईनमधून पाणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेकडे करत आहोत. परंतु त्यास महापलिकेकडून प्रतिसाद मिळत नाही व पाणीटंचाईमुळे ग्रामपंचायतीस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, त्याकरिता लाखो रुपये महिन्याकाठी खर्च करावे लागत आहेत, असे उंड्रीच्या सरपंच श्वेता घुले यांनी सांगितले.