शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दीनदयाळ रोडवासींचाही रुंदीकरणाला विरोध!

By admin | Updated: November 2, 2016 03:28 IST

पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला

डोंबिवली : पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला आहे. या कारवाईविरोधात तेथील रहिवाशांनी नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवली. शहरविकासाच्या नावाखाली रहिवाशांना रस्त्यावर आणू पाहणाऱ्या केडीएमसी प्रशासनाचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला विश्वासात न घेता राबवली जाणारी मोहीम चुकीची आहे, असे मत पं. दिनदयाळ मार्ग रहिवाशी संघर्ष समितीने मांडले आहे.पश्चिमेतील द्वारका हॉटेल ते रेतीबंदर रोड हा पंडित दिनदयाळ मार्ग आहे. केडीएमसीने हाती घेतलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेत या रस्त्याचाही समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयाने या मार्गावरील अनेक निवासी बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात १८ इमारती व १४ बंगले आहेत. त्यामुळे ४८८ कुटुंबे व ८५ दुकाने असे अंदाजे तीन हजार नागरिक विस्थापित होतील, असा दावा रहिवाशी संघर्ष समितीचा आहे. १९९५-९६ मध्ये याच रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. त्यावेळी बाधित झालेले रहिवाशी आणि व्यापारी यांना अद्यापपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे २०१२ मध्ये एका स्थानिक नागरिकाने कारवाईविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात केडीएमसीविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर झालेल्या सुनावणीत या रस्त्याचे काम विकास आराखड्यानुसार पूर्ण झाले आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही पुन्हा त्याच मार्गावर रस्तारुंदीकरणाचा घाट घातला जात आहे, याकडे रहिवाशी संघर्ष समितीने लक्ष वेधले आहे. प्रभाग कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. जबरदस्तीने अन्यायकारक पद्धतीने रुंदीकरण रेटून नेण्याचा केडीएमसीचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि दुकानदारांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता दिनदयाळ रोडवरील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवल्याने ही मोहीम बारगळण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.>‘त्या’ बैठकीचे काय झाले?दिनदयाळ मार्गावरील रस्तारुंदीकरणात आनंदनगर प्रभागातील बांधकामेही बाधित होत आहेत. स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बाधितांची विशेष बैठक बुधवार २६ आॅक्टोबरला बोलावली होती. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात ही बैठक होणार होती. याबाबत संबंधितांना पत्रव्यवहारही करण्यात आले होते. परंतु, बैठक झाली नाही. याचे कारण गुलदस्त्यात असताना आता बाधित थेट आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेणार आहेत.