शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या तळा येथील उर्दू शाळेतील पटसंख्येत घट

By admin | Updated: June 29, 2016 02:46 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या तळा उर्दू शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

तळा : रायगड जिल्हा परिषदेच्या तळा उर्दू शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. १२५ विद्यार्थी संख्या असणाऱ्या तळा शाळेत दोनच शिक्षक आहेत. मात्र या उलट शाळेतून ७-८ विद्यार्थी संख्या आहे आणि तेथेही दोन शिक्षक काम करीत आहेत. शिक्षण विभागाच्या ढिसाळपणाचा त्रास विद्यार्थ्यांना होत असून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय शिकविला जात आहे. येथे मात्र तसे घडताना दिसत नाही. शाळेत इंग्रजी शिकविले जाते की नाही हे पाहण्यासाठी अधिकारीवर्गाला वेळ मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग नाराज झाला असून आपल्या पाल्याला उर्दू प्राथमिक शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत ४ वर्ग असून १२५ विद्यार्थी संख्या आहे. येथे दोनच शिक्षक कार्यरत आहेत. अजून दोन शिक्षकांची आवश्यकता आहे, ते शासनाने अर्थात शिक्षण विभागने द्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दिवसेंदिवस प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती गंभीर होत असताना ती बदलली गेली पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते महमद परदेशी यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)शिक्षकांनी लक्ष द्यावेपालकांची आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत, याकडे असणाऱ्या शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांना या कृतीपासून परावृत्त केले पाहिजे असे पालकांचे म्हणणे आहे.दिवसेंदिवस प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून ती बदलणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महमद परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.