शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 3, 2016 03:46 IST

दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना

ठाणे : दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र, त्या घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर होतेच, शिवाय यामध्ये केवळ कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाणच अधिक होते. दिवाळीच्या चार दिवसात शहरात आगीच्या २५ घटना घडल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ३३ घटना घडल्या होत्या.दिवाळीच्या काळात यंदा भिवंडीत एका कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत देखील आगीचा भडका उडाला होता. दुसरीकडे ठाण्यात मागील वर्षी दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत एका फोमच्या दुकानाला, उपवन येथे एका कंपनीला आणि इतर चार ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चार दिवसात आगीचे प्रमाण हे ३३ होते. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदादेखील आगीच्या घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या घटनांवर आळा बसविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विभाग त्या दृष्टीने सतर्क झाले होते. दरम्यान यंदा चार दिवसात आगीच्या केवळ २५ घटना घडल्या असल्या तरी कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण हे अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यामध्ये असलेल्या केबलला देखील आग लागल्याची घटना सावरकर नगर भागात घडली होती. ही एकच घटना वगळता इतर सर्व आगीच्या घटना या तुरळत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (प्रतिनिधी)गत वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने यंदा चोख व्यवस्था केली होती. आपत्ती आणि अग्निशमन विभागही सतर्क होते.