शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीच्या 'टी.ए बटालियन' भरतीची ‘फेक पोस्ट’ व्हायरल... तरुणांचे लोंढेच्या-लोंढे लष्कराच्या दारातून पुन्हा आपआपल्या घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:15 IST

ऐन दिपावलीच्या तोंडावर लष्कराच्या ११६ बटालीयनमध्ये भरती असल्याबाबतचा संदेश व्हॉटसअपवर फिरल्याने रविवारी  हजारो तरुण भरतीसाठी देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. देवळालीकॅम्प लष्करही हद्दीत असंख्य तरुण भरतीसाठी आल्याची बाब लष्कराला समजल्यानंतर त्यांचीही धावपळ झाली.

ठळक मुद्देलष्कर भरतीसाठी  युवकांची गर्दी झाल्याने देवळालीच्या छावनी परिषदेच्या परिसरात पाय ठेवायला देखील जागा नव्हती नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्याने  रेल्वे स्थानक ओसंडून वाहत होते. लष्कराने बटालीयनमध्ये कोणतीही भरती नसल्याचा फलकही लावल्यानंतर आलेले तरुण निराश

नाशिक : येथील देवळाली कॅम्पमधील ११६ इनफंन्ट्रीच्या बटालीयनमध्ये १६ आॅक्टोबर रोजी लष्कर भरती असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने देशभरातील हजारो तरुणांनी देवळाली कॅम्प गाठले; मात्र अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याची बाब त्यांना कॅम्पमध्ये आल्यावर कळली; अन् देशसेवेची इच्छा तशीच मनात घेऊन शेकडो तरुण लष्कराच्या दारातून पुन्हा आपआपल्या घराकडे परततले.ऐन दिपावलीच्या तोंडावर लष्कराच्या ११६ बटालीयनमध्ये भरती असल्याबाबतचा संदेश व्हॉटसअपवर फिरल्याने रविवारी  हजारो तरुण भरतीसाठी देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. देवळालीकॅम्प लष्करही हद्दीत असंख्य तरुण भरतीसाठी आल्याची बाब लष्कराला समजल्यानंतर त्यांचीही धावपळ झाली. या संदर्भात त्यांनी काही तरुणांची चौकशी केली असता त्यांना व्हॉटसअपवरील फेक संदेशाची माहिती समजली आणि त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. लष्कराने बटालीयनमध्ये कोणतीही भरती नसल्याचा फलकही लावल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.भारतीय लष्कराच्या ११६ इंनफंट्री बटालीयन (टि.ए पॅरा) मध्ये १६ आॅक्टोबर रोजी भरती असल्याचा संदेश सोशल मिडियावर फिरत असल्याने देवळाली मध्ये रविवारी दिवसभर युवकांचे लोंढे दाखल होत राहिले.देशभरातून तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हातून शेकडो च्या संखयेने युवक देवळालीत दाखल झाले होते. आधीच दिवाळीच्या खरेदीसाठी देवळालीत नाशिक जिल्हाच्या विविध भागातून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी असतांना लष्कर भरतीसाठी  युवकांची गर्दी झाल्याने देवळालीच्या छावनी परिषदेच्या परिसरात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. दरम्यान, भरती नसल्याचे समजलज्यानंतर तरुणांनी घरचा रस्ता धरला. कॅम्पमधील खाद्य पदार्थ्यांची दुकाने आणि उपहारगृहामध्ये या युवकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, विविध शहरांमधून आलेले हजारो तरूण मिळेल त्या रेल्वेने घराकडे परतण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्याने  रेल्वे स्थानक ओसंडून वाहत होते.