शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या गाड्यांच्या टोलबंदीबाबत लवकरच निर्णय

By admin | Updated: August 27, 2015 02:12 IST

शहरातील एंट्री पॉर्इंटवर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत

मुंबई : शहरातील एंट्री पॉर्इंटवर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात कोल्हापूरच्या टोलबाबत मंत्रालयात बैठक होईल आणि त्यात मुंबईबाबतही चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील आडोशी येथील बोगद्याजवळ दरड कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. १९ जुलैला झालेल्या दुर्घटनेनंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुमन दत्ताराम पंडित आणि बांधकाम विभागाचे माजी सचिव एम. व्ही. पाटील समितीचे सदस्य असतील. समिती ३० सप्टेंबरपर्यंत शासनाला अहवाल सादर करणार आहे.समिती दरड कोसळण्याची कारणे शोधेल, देखभालीची जबाबदारी निश्चित करेल, विविध यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या कामात दोष आढळल्यास त्याचीही नोंद घेतली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)