शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट्रोलपंप कारवाईचा निर्णय शासन घेणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:10 IST

देशभर पसरलेल्या पेट्रोल घोटाळ्याच्या व्याप्तीचा संपूर्ण तपशील शासनस्तरावर सादर करण्यात आला आहे. याशिवाय तपासातून मिळालेली माहिती संबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : देशभर पसरलेल्या पेट्रोल घोटाळ्याच्या व्याप्तीचा संपूर्ण तपशील शासनस्तरावर सादर करण्यात आला आहे. याशिवाय तपासातून मिळालेली माहिती संबंधित पेट्रोल कंपन्यांनाही दिली आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये पेट्रोलपंपांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनस्तरावर किंवा पेट्रोलियम कंपन्यांच्या स्तरावरच घेतला जाईल, अशी माहिती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी मंगळवारी दिली.या घोटाळ्याचा सूत्रधार प्रकाश नुलकरला कर्नाटकातून अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे स्पष्ट झाले. ा्रकाश नुलकरचे विदेशातील हस्तक कोण आहेत, त्यांच्याशी त्याचे आर्थिक व्यवहार नेमके कसे होते या मुद्द्यांवर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी दिली. त्याच्या काही साथीदारांचा तपशील मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. जवळपास एक महिन्यापासून ठाणे पोलीस पेट्रोल घोटाळ्याचा तपास करीत आहेत. गुजरात, मध्य प्रदेशसह ईशान्येकडील काही राज्यांमध्येही पेट्रोलपंपांवर ग्राहकांची राजरोस फसवणूक होत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पेट्रोलपंपांवर अशा प्रकारची हेराफेरी करण्याचे प्रमाण दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, तपासाची संपूर्ण माहिती शासनस्तरावर सादर केली आहे. संबंधित पेट्रोलियम कंपन्यांनाही आवश्यक तो तपशील दिला आहे. त्यामुळे इतर राज्यांमधील पेट्रोलपंपावर कारवाई करण्याचा निर्णय शासनस्तरावर किंवा पेट्रोलियम कंपन्यांकडून घेतला जाईल, असे ते म्हणाले. ठाणे पोलिसांनी केवळ राज्यातील कारवाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. आरोपींकडून माहिती मिळेल, त्यानुसार कारवाई सुरू राहील, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.