शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सराफांच्या बंदवर आज निर्णय?

By admin | Updated: April 5, 2016 01:07 IST

अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदवर मंगळवारी दिल्लीत देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

पुणे : अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदवर मंगळवारी दिल्लीत देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बंद सुरू ठेवायचा की नाही यावर निर्णय होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी दिली.केंद्र सरकारने आणलेल्या अबकारी कर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सराफ संघटनांचा बेमुदत बंद सुरू आहे. बंदच्या कालावधीत संघटनांनी ठिकठिकाणी विविध मार्गाने आंदोलन करून सरकारचा निषेध केला. पुण्यात राज्यभरातील सराफांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला. बंदला महिना उलटून जाऊनही त्यावर केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा बंद मिटण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. तीन दिवसांवर गुढीपाडवा सण आला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांसह सराफांसाठीही हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवसापर्यंत सराफांचा संप मिटेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सराफ सुवर्णकार असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना अ‍ॅड. रांका म्हणाले, बैठकीमध्ये बंदचा आढावा घेण्यात आला. बहुतेक सदस्य मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आज सर्व सदस्यांना दि. ६ एप्रिलपर्यंत दुकाने बंदच ठेवण्याचे कळविण्यात आले आहे. मंगळवारी दिल्लीत देशातील संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीत बंदवर निर्णय घेतला जाईल. त्यानुसार बुधवारी राज्य असोसिएशनची बैठक घेऊन त्या निर्णयावर चर्चा होईल.