शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

धनगर आरक्षणाबाबत १५ दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री

By admin | Updated: January 4, 2015 19:29 IST

धनगर आरक्षणासंदर्भात अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. ४ - धनगर आरक्षणासंदर्भात अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आरक्षणात सरकार हात घालणार नाही असे  आश्वासनही त्यांनी दिले असून अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई नगर असे नामकरण करण्यासंदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 
रविवारी धनगर समाज आरक्षण परिषदेतर्फे नागपूरमध्ये अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका मांडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षणासंदर्भात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आमचे सरकार तातडीने निर्णय घेण्यास कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. धनगर आरक्षणाचा निर्णय घेताच याविरोधात काही संघटना कोर्टात जातील. आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे मत जाणून घेऊ आणि १५ दिवसांत योग्य तो निर्णय जाहीर करु असे आश्वासनही त्यांनी दिले. आमचं सरकार हे आदिवासींच्या हिताचेही रक्षण करणारे असल्याने आदिवासी आरक्षण कोट्याला धक्का पोहोचणार नाही. त्यामुळे आदिवासी समाजानेही निश्चिंत राहावे असे फडणवीस यांनी नमूद केले. 
 
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आणि अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई नगर असे नामकरण करावे अशी मागणी या अधिवेशनात करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन देणे टाळले.  विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विचार चांगला आहे. तर अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे नामकरण केल्यास वाद निर्माण होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांशी यासंदर्भात चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी सांगितले.