शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला पोलीस ठाण्यांवर मोर्चे, राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार - शेतकरी कर्जमुक्ती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 02:20 IST

सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.

जळगाव : केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असून यात सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर मंगळवारी दुपारी ही परिषद पार पडली. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, सुकाणू समिती सदस्या सुशिला मोराणे, अशोक ढवळे, नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, एस.बी. पाटील आदी उपस्थित होते.शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलितनिवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन मोदी विसरले.एक चहावाला लाल किल्ल्यावर भाषण देतो, याचा कष्टकºयांना अभिमान वाटला, मात्र आता २०१९ नंतर मोदींना कधीही लाल किल्ल्यावर जाता येणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.सरकारविरुद्धचा कृती कार्यक्रमबलिप्रतिपदेला राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतकरी मोर्चे, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचे श्राद्ध घालणे तसेच२० नोव्हेंबर रोजी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिल्लीत धडक देण्याचीही घोषणा परिषदेत करण्यात आली.सरकार सर्व आश्वासने विसरून चुकीचे निर्णय घेत असल्याने शेतकºयांसह अभियंते, अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. येथे कोणालाच ‘अच्छे दिन’ नसून तीन वर्षात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित असल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी