शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाषा संस्था विलीनीकरणाचा निर्णय अधांतरी!

By admin | Updated: April 27, 2015 03:26 IST

राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला

राजेश पाणूरकर, नागपूरराज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. या निर्णयाला विरोध झाल्याने शासनाने एका समितीची स्थापना करून अहवाल मागितला. समितीने अहवाल वेळेत सादर केला असला तरी शासनाने मात्र काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सरकार बदलले, पण भाषा संस्था विलीनीकरणाचा निर्णय रखडलेलाच आहे़ दोन्ही विभागांचे विलीनीकरण करून ‘मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संस्था’ निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण सांस्कृतिक क्षेत्रातला विरोध पाहता यासंदर्भात पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. यशवंत मनोहर, समीक्षक डॉ. वि.स. जोग, रेखा बैजल, प्रवीण दवणे आणि मराठी भाषा विभागाचे उपसचिव यांची समिती नेमण्यात आली. समितीने या भाषा संस्थांचे विलीनीकरण करणे कितपत योग्य, व्यवहार्य किंवा कसे, या अनुषंगाने अहवाल शासनाला दिला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन याबाब सकारात्मक निर्णय तातडीने घेईल, असे अपेक्षित होते. पण अद्याप त्यावर विचारही करण्यात आला नाही. महसुली खर्च वाचविण्यासाठी शासनाने भाषेसंदर्भात निर्णय घेणाऱ्या या दोन संस्थांचे विलीनीकरण करू नये, यासाठी राज्यातून तीव्र विरोध करण्यात आला होता. समितीने दिलेल्या अहवालावर विचार करून योग्य निर्णय शासनाने घेणे अपेक्षित आहे. त्यात मंत्री विनोद तावडे यांनी मराठी भाषा विकास संस्था आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेचा कळवळा असल्याचे भासविणाऱ्या मंत्र्यांनी मराठी भाषेच्या स्वतंत्र संस्थांचे विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला साहित्य क्षेत्रातून विरोध होत आहे.