शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अडतीचा निर्णय समितीच्या कोर्टात

By admin | Updated: January 16, 2015 06:19 IST

अडत्यांचे कमिशन शेतक-यांकडून वसूल करण्यास खुद्द राज्य सरकारचा विरोध असल्याने याबाबत फेरविचार करण्याकरिता गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत

मुंबई : अडत्यांचे कमिशन शेतक-यांकडून वसूल करण्यास खुद्द राज्य सरकारचा विरोध असल्याने याबाबत फेरविचार करण्याकरिता गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार यांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. अडत न स्वीकारणारे आणखी एक मार्केट स्थापन करा आणि शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचनाही बैठकीत पुढे आली. सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगारांचे नेते व प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधितांनी आपापली बाजू मांडली. मात्र या वेळी किमान १५० ते २०० जण उपस्थित असल्याने सर्व संबंधितांचे दोन ते तीन प्रतिनिधी घेऊन एक समिती स्थापन करावी. ही समिती देशातील वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन तेथील मार्केट कमिटीमधील व्यवहारांचा अभ्यास करील. त्याचबरोबर अांतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी व व्यापारी यांच्यातील व्यवहारांची समितीने माहिती घ्यावी, अशी सूचना माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी केली.अडतीची पद्धत केवळ पंजाबमध्ये असल्याचा दावा बैठकीत शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केला. मात्र गुजरातमध्येही ‘अ‍ॅडव्हान्स’ या शब्दाचा वापर करून अडतीचे व्यवहार होतात. महाराष्ट्रात ‘कमिशन’ या शब्दाच्या वापरामुळे जर वाद होत असतील तर गुजरातचे अनुकरण करण्यास आपली तयारी असल्याचे व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचे मत होते. राज्य सरकारने अडतीचे व्यवहार होणारे व अडतीचे व्यवहार न होणारे अशी दोन मार्केट स्थापन करावीत, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध होतील, अशी सूचना व्यापाऱ्यांनी केली.बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत श्ािंदे, नरेंद्र पाटील, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी संजय पानसरे, अशोक हांडे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)