शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महसुली अपिलांवर वर्षभरात निर्णय होणार

By admin | Updated: March 17, 2016 00:43 IST

महसूल विभागात दाखल होणारे अपील वर्षानुवर्षे निकाली निघत नाहीत. काही प्रकरणे तर तीन पिढ्यांपर्यंत चालतात. यामुळे वेळीच न्याय मिळत नाही. मात्र, यापुढे कोणत्याही महसुली अपिलावर

मुंबई : महसूल विभागात दाखल होणारे अपील वर्षानुवर्षे निकाली निघत नाहीत. काही प्रकरणे तर तीन पिढ्यांपर्यंत चालतात. यामुळे वेळीच न्याय मिळत नाही. मात्र, यापुढे कोणत्याही महसुली अपिलावर संबंधित अधिकाऱ्याला वर्षभराच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशिष्ट परिस्थितीतच सहा महिने अधिक मुदतवाढ घेता येईल. या संबंधीचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुुधारणा) विधेयक, २०१६ बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी संबंधित विधेयक मांडले. खडसे म्हणाले, ‘सद्यस्थितीत कोणतेही महसुली दावा असेल, तर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्री व न्यायालय असा प्रवास होतो. आता अधिकाऱ्यांना अपिलावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. या अपिलांवर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातह एक अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचे पद तयार केले जाईल.’ या विधेयकातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली सांगताना खडसे म्हणाले, ‘अपिलाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. टपालातून आलेल्या अर्जांचीही नोंदणी केली जाईल. त्याच दिवशी पोच दिली जाईल. आलेल्या अर्जांची छाननी सुट्टी वगळून तीन दिवसांच्या आत करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल.’ अर्ज कोणत्या वर्गवारीत बसतो, हे अपीलकर्त्याला सात दिवसांत कळविले जाईल. विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, ‘अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर सर्वकाही अवलंबून आहे. बऱ्याच वेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सुनावणीच्या प्रकरणात अन्याय होतो. आधीच कामाचा भार असलेल्या अधिकाऱ्यांकडेच हे काम सोपविण्यात आले, तर अपिलाला न्याय न मिळण्याची शक्यता आहे.’ (प्रतिनिधी)