नागपूर : पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंगळवारी सुनावणी झाली. या वेळी चौकशी समितीने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. दरम्यान, खडसे यांच्या वतीने चौकशी समितीपुढे सादर केलेल्या दोन अर्जांवर चौकशी समिती बुधवारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. महसूलमंत्री असताना खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाइकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. झोटिंग यांची एकसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समिती गेल्या आठ महिन्यांपासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. एमआयडीसीकडून साक्ष, पुरावे सादर करण्यात आले. मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. त्या वेळी समितीने खडसे यांना सोमवारी अर्धवट राहिलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाली आहेत. (प्रतिनिधी)
खडसेंच्या अर्जावर आज निर्णय
By admin | Updated: March 1, 2017 05:32 IST