शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या अर्जावर चौकशी समितीचा उद्या निर्णय

By admin | Updated: February 28, 2017 19:38 IST

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंगळवारी सुनावणी झाली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी चौकशी समितीने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. दरम्यान, खडसे यांच्यावतीने चौकशी समितीपुढे सादर केलेल्या दोन अर्जावर बुधवारी चौकशी समिती निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.
 महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. झोटींग यांची एक सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समिती गेल्या आठ महिन्यापासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. एमआयडीसीकडून साक्ष, पुरावे सादर करण्यात आले.  मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी समितीने खडसे यांना सोमवारी अर्धवट राहिलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, सोमवारीच खडसे यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी दोन नवीन अर्ज चौकशी समितीसमोर सादर केले होते. यात चौकशी समितीने काही नवीन मुद्यांचाही चौकशीत समावेश करावा आणि साक्षीदारांची फेर साक्ष घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या अर्जावर मात्र एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी आक्षेप घेतला आहे. या अर्जावर न्या. झोटिंग यांची एक सदस्यीय चौकशी समिती बुधवारी निर्णय घेणार आहेत.
 
प्रकरण न्यायप्रविष्ट, बोलणे योग्य नाही...
एखादे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यास त्यावर भाष्य करणे योग्य नाही, हे सर्वसाधारण संकेत आहेत. हे प्रकरणही सध्या न्याय प्रविष्ठ आहे. तेव्हा यावर बोलणे योग्य होणार नाही.
- एकनाथ खडसे, माजी महसूल मंत्री