शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2016 03:02 IST

राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही

पुणे : राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. गणेश कला क्रीडा मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, गटनेते किशोर शिंदे उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, ‘‘जातींचा विचका व्ही. पी. सिंग यांनी केला. उत्तर प्रेदशात ढाब्यावर चहा देतानाही जात विचारली जाते. आपल्याला महाराष्ट्राचा उत्तर प्रेदश, बिहार करायचा का? आतापर्यंत कुठल्याही जातीच्या पुढाऱ्याने जातींचे भले केलेले नाही. निवडणुकांसाठी वापर करून सोडून देतील.’’पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नये म्हणून आंदोलन केले, त्यावेळी मांडवली केल्याचा आरोप झाला. या भिकारड्यांकडून मी विकला जाणार नाही. आमचा जवान शहीद होतोय आणि आमचे निर्माते पाकच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत आहेत. मला यात यश मिळाले म्हणून अनेकांना पोटशूळ झाला असे ‘ए दिल मुश्किल’ प्रकरणावरून झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन-दोनचे प्रभाग असताना नगरसेवकांना काम करता येत नव्हते, एखाद्याने विकासकामाचा प्रस्ताव दिला की दुसरा नगरसेवक त्याला विरोध करायचा. आता ४-४चे प्रभाग केले आहेत. आता चौघे काय कॅरमवर सोंगटी खेळत बसणार का? यातून लोकांच्या हाताला फक्त पावडरच लागेल अशी टीका त्यांनी केली. मोदींच्या घोषणेने झाकोळले भाषणमराठी वृत्तवाहिन्यांसाठी राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मोठी पर्वणी असते. मंगळवारी राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांवर केवळ याचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने ठाकरे यांचे भाषण झाकोळले गेले.मराठी म्हणून अन्याय झालाराज ठाकरे यांनी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा संदर्भ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीचे उदाहरण दिले. मात्र त्या अधिकाऱ्यावर जातीमुळे नव्हे तर मराठी असल्यामुळे अन्याय झाला आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.पक्ष बदलणारे फेरीवालेमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोघा नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याची खिल्ली उडवताना ठाकरे यांनी या पक्षांतर करणाऱ्यांना फेरीवाल्याची उपमा दिली.