शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील चार दिवसांचा ड्राय डे रद्द ,हायकोर्टाचा निर्णय

By admin | Updated: February 1, 2017 23:21 IST

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला चार दिवसांचा ड्राय डे उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला चार दिवसांचा ड्राय डे उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला आहे. आता फक्त फोन दिवस ड्राय डे असणार आहे .
वसई तालुका हॉटेल असोसिएशनने याबाबत उच्च न्यायालयात धधाव घेतली होती. कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे.  त्याची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी आणि ६ फेब्रुवारी असा ४ दिवसांचा ड्राय डे लागू करण्यात आला होता. 
पालघर जिल्ह्यात २ हजार बार, वाईन शॉप आहेत. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार होता. ३ फेब्रुवारीला मतदान आहे तर १ तारखेपासून ड्राय डे का असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे वसई तालुका हॉटेल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली आणि न्यायालयाने हा ड्राय डे रद्द केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता केवळ मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्या ६ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंतच ड्राय डे राहणार आहे.
 ४ दिवसांचा ड्राय डे हा मूर्खपणा होता. एका बारला प्रतिदिवसी शासनाची फी अडीच हजार रुपये, बिल, कर्मचारी पगार मिळून  १५ हजार रुपये खर्च असतो. तीन दिवसात त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असते. न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याचे, वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी सांगितले.