शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कसिनो सुरू करण्याबाबत निर्णय घ्या-उच्च न्यायालय

By admin | Updated: October 11, 2015 01:54 IST

कसिनो कायदेशीर करण्यासंदर्भात चार दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कायद्यावर अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.

मुंबई : कसिनो कायदेशीर करण्यासंदर्भात चार दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कायद्यावर अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.महाराष्ट्र कसिनो (नियंत्रण व कर) कायद्यावर अंमलबजावणी करावी, यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या जय सायता यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. ‘सरकारने कसिनो चालवण्यास संमती दिली, तर सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल,’ असे सायता यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.याचिकेनुसार, राज्यपालांनी या कायद्याला २२ जुलै १९७६ रोजी मंजुरी दिली आहे. डिसेंबरमध्ये याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कायद्यावर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच निर्णय घेतला नाही. या कायद्याद्वारे काही खेळांना मान्यता देऊन त्यावर कर लावण्याची मुभा सरकारला आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप या कायद्यावर अंमलबजावणी करण्याबाबत अधिसूचना काढली नाही. कायद्यावर अंमलवजावणी करायची की नाही किंवा कधी करायची, यावर सरकारच निर्णय घेऊ शकते, असे म्हणत खंडपीठाने सरकारने यावर निर्णय घ्यावा, असे म्हणत ही याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)