शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारसा संवर्धन समिती नेमण्याबाबत निर्णय घ्या !

By admin | Updated: April 23, 2017 02:42 IST

कोल्हापूर जिल्ह्यासाठी वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊनही कुरुंदवाड नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत वारसा संवर्धन

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यासाठी वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊनही कुरुंदवाड नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत वारसा संवर्धन समिती स्थापण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतली. नगर परिषदेच्या या भूमिकेवर संतापत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले.भालचंद्र टॉकीज व अन्य ६ वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करून, त्यासंबंधी वारसा संवर्धन समिती स्थापन करावी व तोपर्यंत भालचंद्र टॉकीजच्या वास्तूमध्ये कोणतेही बदल करू नयेत, असा आदेश राज्य सरकार व कुरुंदवाड नगर परिषदेस द्यावा, अशी मागणी करणारी याचिका कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोकरे व अन्य चौघांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे न्यायालयात दाखल केली.याचिकेनुसार, कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, त्याचे संस्थान अधिपती हे पटवर्धन घराणे होते. त्या पटवर्धन संस्थानिकांनी त्यांच्या कार्यकालामध्ये कला, संस्कृती व खेळास प्रोत्साहनासाठी कृष्णा घाट व त्याच्या परिसरातील वास्तू, विष्णू मंदिर, गणपती मंदिर, भालचंद्र टॉकीज, दर्ग्यामधील भूगंधर्व रेहमत खान यांची समाधी आदी ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहेत, त्यांचे जतन करणे केंद्र सरकारच्या हेरिटेज नियमावलीप्रमाणे बंधनकारक आहे.नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची सुस्थितीतील वास्तू पाडून तेथे शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत त्याला स्थगिती दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)शॉपिंग सेंटरच्या ठरावाला स्थगितीकुरुंदवाड नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत असतानासुद्धा, ती पाडून त्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत या ठरावास स्थगिती दिली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.