शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर २०१८ पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त

By admin | Updated: June 28, 2016 03:42 IST

रस्ते बांधकामात राज्य आणि केंद्र सरकार येत्या तीन वर्षांत १ लाख २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

मुंबई : रस्ते बांधकामात राज्य आणि केंद्र सरकार येत्या तीन वर्षांत १ लाख २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. २०१८ अखेर महाराष्ट्र खड्डेमुक्त झालेला दिसेल. मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही तोवर पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण - २ हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण -४७ हजार कोटी, त्यांचे काँक्रिटीकरण - १५ हजार कोटी, नूतनीकरण - १ हजार कोटी आणि महामार्ग सुरक्षा व भूसंपादनासाठी २ हजार कोटी असे ६७ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर झाले आहेत. राज्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्रे, कृषी उद्योग केंद्रांचा अभ्यास करून त्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसाठी ३० हजार कोटी रुपये खर्चाची योजना दुसऱ्या टप्प्यात राबविली जाईल. मुंबई-गोवा महामार्गाचे इंदापूर ते सावंतवाडी रस्त्याच्या कामासाठी तीन निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. राज्यात १७३ रेल्वे उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. त्यातील १५० पूल हे केंद्र सरकार बांधणार असून ते दोन वर्षांत पूर्ण होतील. पनवेल ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या कामावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे ८५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५५ किलोमीटरच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्णाच्या पालकमंत्र्यांसह येत्या पंधरवाड्यात आपण प्रत्यक्ष पाहणी करू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>बांधकाम ठिकाणी माहिती फलक अनिवार्यसार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणाऱ्या कोणत्याही विभागाच्या इमारतीचे बांधकाम वा दुरुस्तीच्या ठिकाणी त्या कामाबाबतची माहिती देणारा फलक आता लावण्यात येणार आहे. कामाचे नाव, त्यासाठीची किंमत, कंत्राटदाराचे नाव, करारनाम्याचा संदर्भ, कार्यारंभाचा दिनांक, कामाचा कालावधी, काम पूर्ण होण्याचा दिनांक, संपर्काचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक त्यावर नमूद करण्यात येईल, असा आदेश आज बांधकाम विभागाने काढला.