शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवर विरोधकांची माघार

By admin | Updated: December 15, 2015 04:04 IST

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच

- अतुल कुलकर्णी,  नागपूर

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच आपल्या मागणीवरून माघार घेतली. माघार घेताना सन्माननीय तोडगा काढा असा लटका आग्रह विरोधकांनी धरला आणि अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सफळ शिष्टाई करीत दुसऱ्या आठवड्यात सुरू केले.काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत कामकाजात भाग घ्यायचा की नाही, यावर बरीच चर्चा झाली. कामकाजात सहभागी तर होऊ पण विरोधकांची प्रतिष्ठा राहिली पाहिजे असा तोडगा काढला नाही तर आपली बदनामी होईल असा सूर बैठकीत निघाला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यासह सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावली. आमचा मान राहिला पाहिजे, असा आग्रह विरोधकांनी त्या बैठकीत धरला. शेवटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, असे गिरीश बापट विरोधी पक्षनेत्यांसोबत माध्यमांना जाऊन सांगतील आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर परिषदेत शेतकरी आत्महत्या विषयावर आणि विधानसभेत पुरवणी मागण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू होईल असे ठरले. त्यानुसार कामकाज सुरू झाले.त्यातही विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित राजकारण केले. कितीही भाषणे झाली तरी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळणार नाही यासाठी विधानसभेत दुष्काळावरील चर्चा रात्री उशिरा सुरू होईल असे नियोजन करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. रात्री ७ च्या सुमारास ही चर्चा झाली. वरच्या सभागृहात मात्र विरोधकांचे बहुमत असल्याने पुरवणी मागण्यांवर उद्या चर्चा करू, आधी दुष्काळावर बोलू असे सांगत सभापतींनी दुष्काळावरची चर्चा सुरू केली. मात्र पहिल्या आठवड्यात काँग्रेसने काढलेल्या मोर्चासाठी सभागृह बंद पाडले गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला जायचे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृह बंद पाडले या आरोपाला पुष्टी देणारी आजची कृती होती अशी प्रतिक्रिया नंतर भाजपाच्या नेत्यांनी दिली. नाव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले पण कामे मात्र दोन्ही काँग्रेसनी आपापली उरकून घेतल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होती. दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. चर्चेला उत्तर मिळाल्यानंतरच सरकार सकारात्मक आहे म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट होणार आहे.सगळे कसे शांत शांत- अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत पार पाडले जाणार हे स्पष्ट झाले आणि अधिवेशन परिसर सुस्तावला. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर तर विधान परिषदेत दुष्काळावर चर्चा सुरू झाली. बोलणारे मोजके सदस्य बाहेर पडले.