शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिज माफियांना अभय

By admin | Updated: June 7, 2017 02:50 IST

अडवली - भुतावलीमधील डेब्रिजच्या भराव प्रकरणी ठाणे तहसीलदारांनी मयूरेश सिम्पोनी या जमीन मालक कंपनीला मार्चमध्ये कारवाईची नोटीस दिली

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अडवली - भुतावलीमधील डेब्रिजच्या भराव प्रकरणी ठाणे तहसीलदारांनी मयूरेश सिम्पोनी या जमीन मालक कंपनीला मार्चमध्ये कारवाईची नोटीस दिली आहे. ५३,९४५ ब्रास मातीचा भराव केल्याचा ठपका ठेवला असून संबंधितांकडून खुलासा मागविला आहे. वास्तविक भरावाचा आकडा अत्यंत कमी दाखविला जात असून मागील तीन वर्षांपासून फक्त नोटीस दिली जात असून प्रत्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील अडवली-भुतावली गावच्या परिसरामध्ये मयूरेश सिम्पोनी कंपनीच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड तयार करण्यात आले आहे. रोज एक ते दीड हजार डंपरमधून बांधकामाचा कचरा व इतर डेब्रिज येथील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आले आहे. या जमिनीवरील नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजविण्यात आले आहेत. वृक्ष तोडण्यात आले असून शेकडो वृक्ष डेब्रिजच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्येही अतिक्रमण करण्यात आले आहे. डेब्रिज टाकणारे माफिया पूर्वी मयूरेश कंपनीच्या जागेवरच भराव करत होते. परंतु नंतर शेजारील अमोल नाईक व इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरवात झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाण्यास मज्जाव केला जावू लागला. शेतघर पाडण्यात आले. शेतकऱ्यांवर डंपर चालवून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. ‘लोकमत’ने याविषयी आवाज उठविल्यानंतर सरकारी यंत्रणा काही प्रमाणात जागी झाली आहे. २२ मार्चला मयूरेश कंपनीला कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे. २० सर्वे क्रमांकावर पूर्वी ४६,३७८ ब्रास मातीचा भराव केला होता. यामध्ये ७,५६७ ब्रासची भर पडली असून सद्यस्थितीमध्ये ५३,९४५ ब्रास मातीचा भराव तेथे आहे. हा भराव टाकण्यासाठी परवानगी घेतली होती का याचा खुलासा करण्यात यावा. योग्य खुलासा केला नाही तर दंडनीय रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. अडवली - भुतावली परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. अनधिकृतपणे डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड तयार करून तेथे मोठ्या प्रमाणात भराव केला आहे. या प्रकरणी त्रस्त शेतकऱ्यांनी २०१४ पासून सातत्याने तक्रारी केल्या आहेत. परंतु या प्रकरणी अद्याप एकदाही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तीन वर्षे फक्त नोटीस पाठविण्यात येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी संबंधितांकडून शासनाकडे स्वामीत्वधनाची रक्कम भरली आहे का, पैसे भरले असल्यास त्या रकमेचे चलन, गौणखनिज वाहतूक परवान्याचे पुरावे तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.भरावाचा आकडा संशयास्पद : ठाणे तहसीलदारांनी मयूरेश कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये २०१५ पर्यंत ४६,३७८ ब्रास भराव टाकला होता. पुढील दोन वर्षांमध्ये दिवस-रात्र भराव केल्यानंतरही ७,५६७ ब्रासच भराव टाकल्याचा उल्लेख केला आहे. हा आकडा संशयास्पद असून डेब्रिज माफियांना पाठीशी घालण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकरी अमोल नाईक यांनी केला आहे. प्रत्यक्ष कारवाई कधी?: अडवली-भुतावली प्रकरणी ठाणे तहसीलदार कार्यालयाकडून डेब्रिज माफियांना अभय दिले जात आहे. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही माफियांवर एकदाही कारवाई केलेली नाही. फक्त नोटीस देवून काय साध्य करण्यात आले. नोटीस दिल्यानंतरही भराव सुरू कसा राहिला याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. >कोट्यवधीचे नुकसानठाणे तहसीलदारांनी मयूरेश कंपनीला फेब्रुवारी २०१५ मध्ये अनधिकृत भरावप्रकरणी ६ कोटी ४९ लाख रुपये भरण्याची नोटीस दिली होती. ४६,३७८ ब्रास भराव केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, स्वामीत्वधनाची ९२ लाख ७५ हजार व दंडाची ५ कोटी ५६ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये काहीही कारवाई केलेली नाही. २२ मार्च २०१७ ला पुन्हा नोटीस दिली आहे. यामध्ये ५३,९४५ ब्रास भराव टाकण्याचा ठपका ठेवला असून करोडो रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे.