शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयकडून युक्तिवादाला सुरुवात

By admin | Updated: June 23, 2017 03:47 IST

१९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत सीबीआयने गुरुवारी युक्तिवादाला सुरुवात केली. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या वकिलांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करणार असल्याचे विशेष टाडा न्यायालयाला सांगितले होते.गेल्या शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, करीमुल्ला खान, रियाझ सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट यांना दोषी ठरवले. या पाच जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत विशेष सीबीआय वकील दीपक साळवी यांनी युक्तिवादास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या अनेक प्रकरणांचा हवाला साळवी यांनी विशेष न्यायालयाला दिला. दोनच दिवसांपूर्वी युक्तिवादाला सुरुवात करण्याआधी साळवी यांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करू, असे विशेष न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने सालेम, मुस्तफा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान व फिरोज खान यांना आयपीसी, टाडा, शस्त्रास्त्रे कायदा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी व बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या सर्व कायद्यांतील कलमांतर्गत या सर्व दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मात्र सालेमच्या प्रत्यार्पणावेळी भारत व पोर्तुगालमध्ये झालेल्या करारानुसार त्याला फाशीची शिक्षा ठोठावता येऊ शकत नाही. त्यामुळे सालेमला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. तर सहावा आरोपी रियाझ सिद्दिकी याला केवळ टाडाअंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यालाही जन्मठेपच होऊ शकते. सातवा आरोपी अब्दुल कय्युम याची सुटका न्यायालयाने केली आहे.