शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

घरगुती कारणावरून सुनांमध्ये वाद, एकीचा खून

By admin | Updated: December 3, 2014 00:30 IST

खामगावातील घटना.

खामगाव : एकाच कुटुंबातील दोन सुनांमध्ये घरगुती कारणावरून वाद होऊन, एकीने दुसरीचा खून केल्याची घटना मंगळवारी खामगाव येथे घडली.खामगाव शहरातील शिवाजी नगर पोलिस स्टेशननजीक वसंधानी कुटुंबातील कमलेश व राजेश वसंधानी यांचे संयुक्त कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दोन्ही भावांच्या पत्नी, सौ. गायत्री कमलेश वसंधानी (वय ३३) व सौ.सुनीता राजेश वसंधानी (वय ३१) यांच्यात मंगळवारी घरगुती कारणावरुन वाद झाला. या वादात सौ.सुनीताने सौ.गायत्रीच्या पोटावर चाकुने वार केले, तसेच डोक्यावर हातोडा मारला. त्यामुळे सौ.गायत्री जागीच गतप्राण झाल्या. याप्रकरणी कमलेश पुरुषोत्तम वसंधानी यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी सौ. सुनीता हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. विशेष म्हणजे, या घटनेनंतर आरोपी सौ.सुनीता हिने स्वत: शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये जावून हल्ल्याचा बनाव केला. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन सौ.गायत्री हिच्या अंगावरील दागिने लंपास केले, तसेच चाकू व हातोडीने वार करुन जीवे मारले, अशी बतावणी तिने पोलिसांजवळ केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर सौ.सुनीता हिला पोलिसी खाक्या दाखवताच, तिने खूनाची कबुली दिली.