शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावरून वाद

By admin | Updated: April 7, 2017 06:09 IST

शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

मुंबई : शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने विविध ढोल पथकांना गडावर १ हजार ढोलांची सलामी देण्याचे आवाहन केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, असा कोणताही कार्यक्रम मंडळाने आयोजित केला नसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.कदम म्हणाले की, गेल्या १२२ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर परंपरेने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यंदा मंडळाने रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदीया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याशिवाय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालक मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह स्थानिक महापौर, उपमहापौर आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील. या वेळी पालखी मिरवणूक, मराठा रेजिमेंट बँडचे वादन व रायगड जिल्हा पोलिसांतर्फे बंदुकीच्या २१ फैरी झाडून व बँडचे वादन करून मानवंदना दिली जाईल. मात्र ढोल बडवण्याचा कोणताही कार्यक्रम या वेळी होणार नसल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अद्वैत चव्हाण नामक व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊन नाव नोंदणीचे आवाहन केले आहे. ढोल वाजवण्याचे आवाहन करणाऱ्या या पोस्टचा सोशल मीडियावर समाचार घेण्यात आला आहे. कार्यक्रमाला विरोध करत दुर्ग संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या शिवप्रेमींच्या संस्थेने निषेध व्यक्त करत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तर, असा कार्यक्रम होणार नसल्याचे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)