शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना प्रवेशाची चर्चा निराधार; काँग्रेसमध्येच राहणार : कोळंबकर

By admin | Updated: June 27, 2016 01:53 IST

‘मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियातून फिरणारे मेसेज खोडसाळपणाचा प्रकार आहे.

मुंबई : ‘मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियातून फिरणारे मेसेज खोडसाळपणाचा प्रकार आहे. मी पक्षात समाधानी असून, काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी स्पष्ट केले. मूळचे शिवसैनिक असणाऱ्या कोळंबकर यांनी नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेसमर्थक मानले जाणारे कोळंबकर यांनी वडाळा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय नोंदविला आहे. कोळंबकर शिवसेनेच्या संपर्कात असून, लवकरच आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू आहे. मात्र, पक्षांतराच्या बातम्या निराधार आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी मुद्दाम असे मेसेज पसरविण्यात येत आहेत. शिवसेना सोडली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्या पक्षांतरामागे काही कारणे होती. स्वत:च्या फायद्यासाठी ऊठसूट पक्ष बदलणे माझ्या तत्त्वात बसत नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीच्या बळावर मला पक्षात योग्य तो मानसन्मान मिळत आहे. माझ्या कामाची आाणि कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जात आहे, त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कोळंबकर यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू आहे. नवीन वॉर्ड अध्यक्षांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यास, महापालिका निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल. आतापर्यंत अनेकदा इतर पक्षांकडून निमंत्रणे आली. मात्र, त्यात स्वारस्य नाही. मी आणि माझ्या विभागातील कार्यकर्ते पक्षांतच करण्याची सुतराम शक्यता नाही. आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कोळंबकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)