शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर अंगावरून गेल्याने कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: June 8, 2016 02:15 IST

ट्रेलरचे मागील चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

म्हसळा : शहरातील भारत पेट्रोलियम पंपाच्या आवारात झोपलेल्या एका कामगाराच्या अंगावरून दिघी पोर्टमधून लोखंडी कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे मागील चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मनीष सैनी (२६, रा. उत्तरप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे. या अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. म्हसळा शहरातील भारत पेट्रोल पंपाच्या आवारातील पत्र्याच्या शेडच्या कामासाठी आलेला कामगार बुधवारी रात्री पंपाच्या कार्यालयाशेजारील उघड्या जागेत झोपला होता. पंपाच्या आवारात दिघी पोर्टमधून लोखंडी कॉईल घेऊन आलेले अनेक ट्रेलर चालक गाडी उभी करून झोपतात. गुरुवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास वाहन चालक मोहम्मद मन्सूर अलम झुबेर हा आपल्या ताब्यातील ट्रेलर एमएच ४६ एएस ८५४९ माणगांवकडे जाण्यासाठी मागे घेत असताना पंपाच्या आवारात झोपलेल्या कामगाराच्या अंगावर ट्रेलरचे मागील चाक गेले. या अपघात कामगार मनीष सैनी जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहन चालक मोहम्मद मन्सूर अलम झुबेर फरार झाला.या घटनेची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद असून वाहन चालक झुबेरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए.पी.आय. सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे. कॉ. खंदारे करीत आहेत. (वार्ताहर)