शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तपास होणार नाही

By admin | Updated: April 28, 2016 06:06 IST

पानसरे यांच्या हत्येचा तपास घटनेच्या दोन-तीन वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याने, उच्च न्यायालयाने सीबीआय व विशेष तपास पथकाला चांगलेच फैलावर घेतले.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास घटनेच्या दोन-तीन वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याने, उच्च न्यायालयाने सीबीआय व विशेष तपास पथकाला चांगलेच फैलावर घेतले. या दोन्ही व्यक्तींच्या पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील. मात्र, तपास काही पूर्ण होणार नाही. तपासयंत्रणा आणखी किती काळ न्यायालयात तपास अहवाल सादर करणार? असा टोलाही उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना लगावला.डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाने करावा व यावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण राहावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे, तसेच केतन तिरोडकर यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीत सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्यासाठी मुदत मागितली, तर पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीतर्फे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी तपास फारसा पुढे सरकला नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. त्यावर खंडपीठाने या प्रकरणांचा तपास केव्हा पूर्ण करणार? अशी विचारणा सीबीआय व एसआयटीकडे केली. ‘दाभोलकरांची हत्या २०१३ मध्ये, तर पानसरे यांची हत्या २०१४ मध्ये झाली. घटनांना दोन-तीन वर्षे उलटून गेली, तरीही तपासयंत्रणांच्या हाती काहीच लागले नाही? त्यांच्या पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तुमचा तपास काही संपणार नाही. मात्र, आम्ही हे चालू देणार नाही. तुम्ही दाखल केलेल्या अहवालांवरून आतापर्यंत तुमच्या हाती काहीच लागल नाही, असे दिसतेय,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआय व एसआयटीला फटकारले. एसआयटीतर्फे अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमधून पुंगळ्या व शस्त्रांचा अहवाल यायचा असल्याने तपास केव्हा पूर्ण करण्यात येईल, याची मुदत सांगू शकत नसल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘दाभोलकर, पानसरे आणि कर्नाटकमधील कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीने व एकाच शस्त्राने करण्यात आल्याचा संशय तपासयंत्रणांना आहे. त्यामुळे पानसरे हत्याप्रकरणातील मुद्देमाल सीबीआयला सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीकरिता पाठवण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यांचा अहवाल अद्याप आला नसल्याने पानसरे प्रकरणाचा तपास पुढे जात नाही आणि तो केव्हा पूर्ण करण्यात येईल, हेही ठोस सांगता येऊ शकत नाही,’ असे अ‍ॅड. शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले.‘तपास योग्य पद्धतीने आणि त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप असू नये, असे आम्हाला वाटते. मात्र, आता अशी वेळ आली आहे की, यामध्ये जनहित याचिका, कुटुंबीय आणि त्यात कहर म्हणजे आरोपीही (समीर गायकवाड) मध्यस्थी अर्ज करतो. आम्ही कुुटुंबीयांची (पानसरे आणि दाभोलकर) व्यथा समजतो. त्यांना तपास पूर्ण होईल की नाही, याबद्दल शंका आहे. मात्र, त्यांचा न्यायव्यस्थेवर विश्वास हवा,’ असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)>समीर गायकवाडच्या खटल्याला स्थगिती नाही१पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याच्यावर एसआयटीचा तपास सुरू असेपर्यंत, आरोप निश्चित न करण्याची सूचना उच्च न्यायालयाने २९ फेब्रुवारीच्या सुनावणीत कोल्हापूर सत्र न्यायालयाला केली होती. त्यामुळे अद्याप समीर गायकवाडवर आरोप निश्चित करण्यात आले नाहीत. या प्रकरणी समीर गायकवाड याने उच्च न्यायालयात पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेत मध्यस्थी केली.२खटल्याला स्थगिती देऊ नये, अशी मागणी गायकवाड याने केली आहे. त्यावर खंडपीठाने त्याचा अर्ज निकाली काढत सत्र न्यायालयाला सीआरपीसीप्रमाणे खटल्याची प्रकिया सुरू ठेवावी, असे निर्देश दिले. खटल्याला स्थगिती देणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालय २९ एप्रिल रोजी गायकवाड याच्यावर आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.