शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच मृत्यूने गाठले!

By admin | Updated: May 29, 2017 04:23 IST

एकीकडे लगीनघाईची लगबग, तर दुसरीकडे स्वातीच्या अपघाताची बातमी... संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा कोसळलेला डोंगर... उपचारासाठी

अविनाश मुडेगावकर/लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई (जि. बीड) : एकीकडे लगीनघाईची लगबग, तर दुसरीकडे स्वातीच्या अपघाताची बातमी... संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा कोसळलेला डोंगर... उपचारासाठी स्वातीला रुग्णालयात दाखल केले. झुंज सुरू असताना लग्नाच्या दिवशीच मृत्यूने गाठले. बोहल्यावर चढण्याच्या दिवशी सरणावर चढण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर नियतीने आणल्याची घटना जिल्ह्यात घडली.अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील स्वाती सूर्यकांत माने (१९) हिचा विवाह तालुक्यातीलच हातोला येथील तरुणाबरोबर ठरला होता. लग्नाची तारीखही निश्चित झाली. लग्न तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने कुटुंबीय व नातेवाइकांची लग्नाची तयारी सुरू होती. सर्व प्रकारची खरेदी, स्वातीला देण्यासाठी आणलेल्या रुखवतातील विविध वस्तू, आहेर, लग्नाचा भरलेला बस्ता, अशी संपूर्ण तयारी झाली होती. मेकअपचे सामान घेण्यासाठी स्वाती मावशीला घेऊन अंबाजोगाईला आली होती.मावशीसोबत यशवंतराव चौकातून दुकानाकडे जाताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने तिला ३० एप्रिलला जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. शासकीय रुग्णालयातील उपचार तोकडे पडू लागल्याने तिला लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे तिच्यावर सलग २६ दिवस उपचार करण्यात आले. दुर्दैव म्हणजे लग्नाच्याच दिवशी २६ मे रोजी तिचा अंत झाला. ज्या गावातून तिच्या लग्नाची वरात निघणार होती, जे वऱ्हाडी लग्नासाठी जमणार होते, त्यांना तिच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याची कटू वेळ आली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तीन आठवड्यांपूर्वी झाला अपघातअंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील स्वाती सूर्यकांत मानेचा विवाह हातोला येथील तरुणाबरोबर ठरला होता. लग्न तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने कुटुंबीय व नातेवाइकांची लग्नाची तयारी सुरू होती. मावशीसोबत यशवंतराव चौकातून दुकानाकडे जाताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली.