शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पुण्यात कारच्या धडकेत तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू

By admin | Updated: July 22, 2015 12:51 IST

पुण्यातील निगडी येथे भरधाव वेगात असलेल्या गाडीने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २२ - पुण्यातील निगडी येथे भरधाव वेगात असलेल्या गाडीने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी कारचालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे.

शिक्षणासाठी पुण्यात आलेले पाच विद्यार्थी दोन बाईकवरुन बुधवारी पहाटे चहा पिण्यासाठी निगडीतील जकात नाक्याजवळ आले होते.  चहा पिऊन परतत असताना भरधाव वेगात असलेल्या कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघा विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारचालक पळ काढण्याच्या प्रयत्नात होता, मात्र स्थानिकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले. या कारचालकाचे नाव मयूर घुमटकर (वय २९) असे असून अपघाताच्या वेळी तो मद्यधूंद अवस्थेत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. किरण दहाने (वय २४), संकेत समेळ (वय २३), शुभम भालेकर (वय २३) अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.तर अविनाश माने व शिनो जॉन  हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत.